मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

कृतज्ञता


लोकसत्ताच्या १३ ऑगस्टच्या अंकात "वाचावे नेटके" मध्ये अभिनवगुप्त यांनी या ब्लॉगची ओळख मांडली. लोकसत्ताची नेट एडिशन मी रोज पहात असलो तरी कामाच्या व्यापात मला लोकसत्ता पहायची त्या दिवशी सवड झाली नव्हती. मला महाराष्ट्रातून माझ्या मित्राचा फोन आला. त्यालाही मी या नावाने लिहितो हे माहीत नव्हते; पण त्याने "राऊ" हे नाव आणि त्याचा फोटो यावरुन ओळखले आणि मला फोन केला. माझ्या वडीलांना पण त्यांच्या एका मित्राने मुंबईतून असेच ओळखून फोन केला.

हा समीक्षावजा ओळख करुन देणारा लेख मी वाचला आणि कृतज्ञतेने भरुन आलो. आपले कौतुक केलेले कुणाला नाही आवडणार! पण त्याहून अधिक म्हणजे माझे लिखाण अगदी काळजीपूर्वक वाचून, समजून घेऊन, त्यामागची भूमीका समजून घेऊन लिहिलेला हा लेख मला उपकृत करुन गेला. 

अभिनवगुप्त हेही टोपणनावच असावे. पडद्यामागे राहून तटस्थपणे वाचनीय लेखांचा परिचय करुन देणार्‍या या अनामिकाला मी माझे आभार इथूनच कळवतो.

ब्लॉगच्या सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचेही मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या प्रोत्साहनामुळेही लेखनाचा हुरुप वाढतो.

वाचावे नेट-के : कलेक्टराच्या कथा..
अभिनवगुप्त : सोमवार, १३ ऑगस्ट २०१२

१० टिप्पण्या:

 1. लोकसत्ताने दखल घेतली हे उत्तमच. त्यांनी लिहिलंय ते खरंच आहे. फक्त एकच तक्रार आहे ... तुझे कितीतरी अनुभव वेळीच न नोंदवल्यामुळे वाहून जातात, ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तेही इथे येऊ देत!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. खरं आहे गौरी. पण सतत लिहित राहण फार अवघड आहे. त्यातच काही अनुभव निसटून जातात हे खरंच.

   हटवा
 2. लोकसत्ता मधील वाचावे नेटके वाचून मी तुमच्या ब्लॉग पर्यन्त पोहचलो , सर्व लेख फारच छान आहेत ,
  लेखन शैली पण खूपच सुन्दर आहे , विषेशत: प्रान्तांच्या कथा खूप आवडल्या ,
  जॉब प्रोफाइल किती अवघड आहे याची जाणीव जहाली .
  असेच लिहित रहा !!
  Best Wishes
  Ravindra

  उत्तर द्याहटवा
 3. लोकसत्तात आलेल्या त्या लेखामुळेच लोकसत्ताच्या वाचकांनाही (त्यात मी ही आलोच) तुमच्या ब्लॉगचा पत्ता लागला. (आता तुमच्या ब्लॉगची link माझ्या मित्रमंडळींनाही forward करतोय) तुमच्या ब्लॉग वरचे बरेच लेख वाचून झालेत. वाचलेले सगळेच लेख आवडले. 'मिसळपाव'वरही तुम्ही आहात असे समजले. तिथलेही लेख वाचेन. असेच लिहित राहा. अभिनंदन आणि धन्यवाद......

  उत्तर द्याहटवा
 4. खुपच छान लिखाण आहे, भावी लिखानास शुभेच्छा..............
  http://parth-sarathi.blogspot.in/

  उत्तर द्याहटवा