जवळपास ‘इडियट’ असणारा फॉरेस्ट गम्प त्याच्या एकाच होपलेस आयुष्यामध्ये अशा गोष्टी अनुभवतो की ज्या भल्या भल्यांच्याही वाट्याला येणार नाहीत. युद्धामध्ये अनपेक्षितपणे असाधारण कामगिरी, तीन राष्ट्राध्यक्षांसोबत चहा, एका राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याचे कारण, सतत धावत राहणारा माणूस म्हणून देशव्यापी प्रसिद्धी, ध्यानी मनी नसताना अनेकांना आपल्या निरर्थक बोलण्याने स्फूर्ती देणे आणि त्यांच्या समृद्धीचे कारण बनणे आणि एका फॉर्च्युन फ़ाइव्ह हण्ड्रेड कंपनीचा मालक! हे सगळं घडत जातं. एखादं मूल आपोआप मोठं व्हावं त्या सहजतेनं.
आपल्याला काय मिळतं याचा आपल्या लायकीशी काहीही संबंध नसू शकतो. असंच ना?
Very correct, Movie is superb it touches to the heart of audiences. And the flow of movie is wonderful and makes us believe that it doesn't matter how smart you are but if you put your heart in one thing you can achieve lot of things in your life without knowing what you achieved. Isn't it miracle. Really one of extra ordinary movie.
उत्तर द्याहटवाShashi
खरं आहे. मलाही वाटतं इडियट असतो तर बरं झालं असतं. (इडियट नाही असा सोयीस्कर समज आहे!) सिनेमा अफलातून आहे. प्रश्नच नाही. राहून राहून आश्चर्य याचंच वाटतं की सुचतं कसं हे लोकांना!
उत्तर द्याहटवा